एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातलं मोठं बंड पुकारलंय. त्यानंतर एकनाथ शिंदे, समर्थक आणि भाजप नेत्यांचा संवाद सुरु असल्याचं कळतंय. याशिवाय शिवसेना आमदारांची हॉटेलात राहण्याची सोयही भाजपकडूनच करण्याच आल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे समर्थक सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात का? असा प्रश्न उपस्थित झालाय